अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीतील आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांना चहाच निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच बच्चू कडू महाविकास आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच असेल अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या भेटीवर दिली आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..
शरद पवारांचा दोन दिवसीय अमरावती दौऱ्या चांगलाच चर्चेत ठरला आहे. शरद पवारांच्या भेटीच्या आधी बच्चू कडू यांनी अमरावतीत स्वागताचे मोठे बॅनर लावले होते. यातच आज बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी शरद पवारांनी भेट घेतली आहे. स्व. आर. आर. पाटील आणि पवार साहेबांच्या मदतीने ही मुंबई येथील मिल विदर्भात सुरू होऊ शकली. मदतीची जाणीव म्हणून साहेबांना आमंत्रीत केले व त्यांनी आमच्या विनंतीस मान दिला हा त्यांचा मोठेपणा असल्याचं भेटीनंतर बच्चू कडू यांनी सांगितले.
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा
दरम्यान, काल शरद पवार यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था, यांच्या संयक्त विद्यमाने आयोजित कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ वा जयंती उत्सवानिमित्त शतकोत्तर रौप्यमहोत्सव अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. तिथेही शरद पवारांनी आपली उपस्थिती लावली. तर अमरावतीच्या दौऱ्यावर असताना लोकसभेचे इच्छुक उमेदवार प्रवीण काशीकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणं एवढं सोप्प नाही”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा“काँग्रेसचं ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?” भाजपने काॅंग्रेसला विचारले ‘हे’ पाच प्रश्न
हेही वाचा…“देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा”, जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा सांगितला मार्ग
हेही वाचा.महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं
हेही वाचा“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर