नागपूर : ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षातील नेते सातत्याने महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत असून, आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून टीका केली आहे. “या सरकारमध्ये काही झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचाच या आरक्षणाला विरोध आहे, असं काँग्रेसच्या आमदाराचंच म्हणणं आहे. त्यामुळे, ओबीसींचा कळवळा असेल, तर काँग्रेसनी सत्तेत राहू नये”, असं आवाहन त्यांनी काँग्रेसला केलं आहे.
“…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
आज नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी, “काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच, या सरकारमध्ये झारीतील शुक्राचार्य असून, त्यांचाच या आरक्षणाला विरोध आहे, असा आरोप केला आहे. तसेच, राष्ट्रवादी-शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेस ओबीसींच्या बाजूने आहे, तर ओबीसीविरोधी शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?, असं सवाल करत त्यांनी काँग्रेसला सत्तेतून पायउतार होण्याचे आवाहन केले आहे.
आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
तसेच, “ओबीसींना आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी हवं ते करा, पण ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल होऊ देऊ नका. आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणानुसारच झाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, नाहीतर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. त्यामुळे, आता हे काम सरकारने करून दाखवावं. राज्य मागासवर्गीय आयोगाने, राज्यात ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारनेही आता डिसेंबरपर्यॅत डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.
मोठी घडामोड: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट
दरम्यान, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून भाजपला चांगले फैलावर घेतलं असून, “ओबीसी आरक्षणासाठी जनगणनेचं काम विशिष्ट आयोगाकडे दिलं आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, आम्ही सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केली आहे आणि त्याद्वारे केंद्राकडे उपलब्ध असलेला इंपोरीअल डाटा मिळवून देण्याची कोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Read Also :
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
- मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
- केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…
- पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा खुलासा