मुंबई: राजधानी दिल्लीमध्ये देशपातळीवरील बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी दिलेले अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
हे पण वाचा: अखेर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर, पुणेकरांना दिलासा नाहीच
शाह आणि पवार यांची भेट होणार असल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. मात्र, ही राजकीय भेट आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. सहकार संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं मत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.
हे पण वाचा: मोठी घडामोड: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट
शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवार संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.
हे पण वाचा: आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. महत्त्वाचं म्हणजे १५ दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शाह हे देशाचे नवे सहकारमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकाराच्या मुद्द्यांवर शरद पवार नव्या केंद्रीय सहकार मंत्र्यांना भेटणार आहेत.
Read Also :
- आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा
- “…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
- नितीन गडकरी यांचा मास्टर स्ट्रोक; नागपूर पालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार कोटी रुपायांच्या कामाचे भुमिपूजन
- पेगासस फोन टॅपिंग प्रकरणी: मोदी-शहांवर विश्वास नाही, मित्र पक्षातील बड्या नेंत्याची चौकशीची मागणी
- मुंबई विमानतळावर राडा करणाऱ्या शिवसैनिकांचे राऊतांकडून समर्थन