पुणे : सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार पारिषद घेतली. यावेळी, “ज्या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तिथे दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. त्याबाबत आज संध्याकाळी निर्णय जाहीर करु,” असं मोठं विधान त्यांनी केलं. त्यामुळे, लवकरच काही जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल होणार असून, व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
या पार्श्वभूमीवर, आता राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हे सर्व जिल्हे सोडून इतर २२ जिल्ह्यांत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध
- सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
- रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
- उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
- सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
- खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
- कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
- क्रीडा- सकाळी ५ वा.पासून सकाळी ९ वा./ सायं ६ वा. पासून सायं.९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
- चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
- सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
- अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
- बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
- बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
- कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
- ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
- जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
- व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
- सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
- मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
- खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
- उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
उत्पादनाच्या अनुषंगाने…
- अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
- सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
- राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
- अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील
पुणे (15680), सातारा (8153), सांगली, (7546) कोल्हापूर (5970), अहमदनगर (6610), सोलापूर (4936), रायगड (2830), रत्नागिरी (2249), सिंधुदुर्ग(1986), बीड (1831), पालघर (1115) सक्रिय रुग्ण आहेत.
निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान; व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार पण…
२२ जिल्ह्यांत काय आहेत निर्बंध…
- सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.
- सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
- सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
- कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी
- जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद
- सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
- शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार
- सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना
- नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.
- रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.
- वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी
- राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, पुण्याचा लेव्हल ३ मध्ये समावेश असल्याने, “गेल्या १ महिन्यापासून पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांहून खाली, त्यामुळे आम्ही गेल्या १५ दिवसांपासून सरकारकडे मागणी करत आहोत; की शहरातल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात यावी. पालकमंत्र्यांच्या बैठकीतहि बदल करा अशी मागणी केली, मात्र त्यावर का निर्णय घेतला जात नाही याची माहिती नाही,” अशी खंत पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
Read Also :
- “अजित पवारांसारखा वक्तशीर आणि दिलेल्या शब्दाला पक्का असा दुसरा माणूस नाही”; चंद्रकांत पाटलांचा टोला
- किती दिवस घरात बसायचे, निर्बंध उठवा; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा – चंद्रकांत पाटील
- मुख्यमंत्री ठाकरेंची संभाजी भिडेंनी घेतली भेट; दोघांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा
- “मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते पण…”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- मुंबई विमानतळावर शिवसैनिक राडा; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्ड उखडून फेकून दिला