नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. महापुरूषांचा सातत्याने अपमान होत असल्याच्या मुद्यावरून त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा त्यांनी खुरपुस समाचार घेतला. यावर बोलतांना त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा पेन जप्त करण्याची मागणी केली.
“उद्या सरकारमधील सर्वांत मोठ्या दरोडेखोराचं प्रकरण बाहेर येणार?”; विरोधकांचा कडक इशारा
महापुरूषांचा अपमान केल्यावर चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर संबंधित शाई फेकणाऱ्यावर गंभीर गु्न्हे दाखल केले, पत्रकार तसेच पोलिसांनी देखील निलंबित करण्यात आले. असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी त्यानंतर फेसशिल्ड घातल्याने त्यांना देखील सल्ला देण्यात आला.
एकच भाऊ बच्चू कडू..! अधिवेशनास्थळीच पालीत राहून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनात बसले
शाई फेक प्रकरणावर बोलत असतांना अजित पवार एकदाच मुख्यमंत्र्यांवर उठले. मुख्यमंत्री साहेब तुमचा पेन शाईचा आहे का? शाईचा पेन असेल तर जप्त करा, अशी मागणी करताच मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की, तोच पेन शाईचा नाही. त्यानंतर विधानमंडळात शाईपेनावर बंदी आहे. तुम्ही आमच्या अंगावर शाई फेकली तर माझं काय होईल ? असा खोचक सवालही त्यांनी केला.
“सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”
तसेच तुम्ही हा मुद्दा मस्करीत घेऊ नका. कारण हे प्रकरण पाहिजे तसं नाही. हे झिरपंत गेलं आहे. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून दोन निवडणुका जिंकल्या तर पुढे तुम्हाला यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. असंही अजित पवार म्हणाले.
Read also
- “तुम्ही 4 महिलांना संधी दिली, आम्ही त्यापेक्षा अधिक महिलांना संधी देऊ”; फडणवीसांचं सुचक वक्तव्य
- विदर्भ मजबूत , तर राज्य मजबुत…! मुख्यमंत्र्यांचं विदर्भसाठी खास पॅकेज जाहीर
- “उद्धवजी, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा, बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका”
- “अनिल देशमुख साहेबांची राजकीय कारकीर्द स्वच्छ … करारा जबाव मिलेगा”
- “तोपर्यंत तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या…! अजित पवार सभागृहातच संतापले”