मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणी दिलासा मिळाला असून त्यांना आता तुरूंगातून जामीनावर सोडण्यात आले आहे. काल त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी त्यांचं तुरूंगाबाहेर स्वागत केलं. तर त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठा गर्दी केली होती. यातच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी यावर भाष्य केलं आहे.
“शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
इडी, सीबीआय गु्न्ह्यातील जामीन आदेशात नमुद केले आहे की, या प्रकरणात कोणतेही पुरावे नाही. परमवीर सिंग आणि सचिन वाझे विश्वासार्ह साक्षीदार नाही, तो अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. जामीन आदेशात असे नमुद करण्यात आले आहे की, हे संपुर्ण प्रकरण वाझेच्या आरोपावर आधारीत आहे. ज्याला एनआयए ने खुनासारख्या आरोपात अटक केली आहे. त्याच्यावर फेक एऩकाऊंटर, वसुली अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. असंही वरपे यांनी म्हटलंं आहे.
“अब्दुल सत्तार या रावणाची लंका दहन करून 2024 ला वनवासाला पाठवू”
सीबीआय गुन्ह्यातील जामीन आदेशात असे नमुद करण्यात आले आही की वाझे हा एक गुन्हेगार स्वरूपाचा व गुन्ह्यातील सहआरोपी होता. ज्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. त्याची पोलीस अधिकारी म्हणून कारकीर्द वादग्रस्त होती. 16 वर्षे सेवेतून निलंबित होता.
आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
अनेक बार मालकांनी सचिन वाझे याला पैसे दिले. या बार मालकांनी 164 अंतर्गत न्यायाधीशांच्या समोर दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की त्यांनी पैसे नंबर 1 साठी दिले ते नंबर 1 तत्कालीन आयुक्त परमवीर सिंगच होते. 144 अंतर्गत नोंदवलेल्या ज्या बाबाचे महत्व हे पेक्षा अधिक होते. अनिल देशमुख साहेबांना केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे नसल्याने अनिल देशमुख साहेबांना दोषी ठरवणे शक्य होणार नाही. देशमुख साहेबांची 30 वर्षाहून अधिकच्या काळात एकही गुन्हा नसणारे राजकीय कारकीर्द स्वच्छ प्रतिमेची आहे, असे कोर्टाचे निरीक्षण आहे. करारा जवाब मिलेगा. असं ही त्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख साहेबांवर केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे नसल्याने अनिल देशमुख साहेबांना दोषी ठरवणे शक्य होणार नाही. देशमुख साहेबांची 30 वर्षाहून अधिकच्या काळात एकही गुन्हा नसणारे राजकीय कारकीर्द स्वच्छ प्रतिमेची आहे असे कोर्टाचे निरीक्षण आहे.
करारा जवाब मिलेगा! @AnilDeshmukhNCP— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) December 28, 2022
Read also
- “तोपर्यंत तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या…! अजित पवार सभागृहातच संतापले”
- “उद्या सरकारमधील सर्वांत मोठ्या दरोडेखोराचं प्रकरण बाहेर येणार?”; विरोधकांचा कडक इशारा
- एकच भाऊ बच्चू कडू..! अधिवेशनास्थळीच पालीत राहून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनात बसले
- “सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”
- “शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारच्या फायली भाजपच पुरवतंय”, संजय राऊतांनी टाकला बाॅम्ब