मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआय प्रकरणी सर्वोच्च न्यायालायला सीबीआयने दिलेल्या जामीन अर्जाची स्थिगितीची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आज त्यांची तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट
सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश पिचेल मनगट परी उरांतिल अभंग आवेश असं म्हणत अनिल देशमुख व आप्तेष्टांवर 110 छापे टाकले. तेरा महिने जेलमध्ये डांबले. पण खऱ्या नं 1 गुन्हेगाराला मात्र संरक्षण दिले. भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत जनताच करेल. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
“स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
यातच अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका होणार म्हणून आज विरोधी पक्षनेते अजित पवार नागपूरहून मुंबईला येणार आहे. त्यासाठी त्यांना सरकारी विमानाची सोय करण्यात आली आहे. अधिवेशनात लोकांचे प्रश्न बाजूला राहिलेत आहेत. त्यात विरोधी पक्षनेत्यांशी अशी प्राथमिकता? पक्ष म्हणून कर्तव्य असतात, पण अधिवेशनात वर्षातून असं किती दिवस असतं? असा सवालही केला जात आहे.
“जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
दरम्यान, अनिल देशमुख यांना हायकोर्टात जामीन मंजूर 12 डिसेंबर रोजी करण्यात आला होता. पण स्वत:चीच ऑर्डर 10 दिवसांनी लागू होईल. असं म्हणत सीबीआय ला सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी वेळ 22 ला पुन्हा ही मुदत 27 डिसेंबर पर्यंत वाढविली पण आज मुदतवाढीस नकार दिला. त्यामुळे देशमुखांना तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“सर्पांनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परी उरांतिल अभंग आवेश” @AnilDeshmukhNCP व आप्तेष्टांवर 110 छापे टाकले, तेरा महिने जेलमध्ये डांबले. पण खऱ्या नं १ गुन्हेगाराला मात्र संरक्षण दिले. भाजपाच्या विकृत राजकारणाचा अंत जनताच करेल. अनिल देशमुख यांना जामिन मिळाल्याचा आनंद आहे. pic.twitter.com/U5ROp8rh2B— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 28, 2022
Read also
- “शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारच्या फायली भाजपच पुरवतंय”, संजय राऊतांनी टाकला बाॅम्ब
- “शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
- “अब्दुल सत्तार या रावणाची लंका दहन करून 2024 ला वनवासाला पाठवू”
- आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
- अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं