नागपूर : राज्याचं हिवाळी अधिवेशन चांगलचं वादळी ठरत आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेेते अजित पवार यांनी भाजपवर चांगलीच टोलेबाजी केली. जर मी मनावर घेतलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन, असं म्हणत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा दिला आहे.
“फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने बारामतीवर विशेष लक्ष्य ठेवलं आहे. अलिकडेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारातमीचा दौरा केला होता. पुढच्या निवडणुकीत बारातमीचा घड्याळ बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यावर आज अजित पवारांनी बावनकुळेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”
भाजपमध्ये आपल्या राज्यात सर्वात जास्त देवेंद्र फडणवीस यांना मानलं जातं. परंतु अलिकडेच त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा घड्याळ बंद पाडल्याचं म्हटलं. मी जर मनावर घेतलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. अन् मी एकदा ठरवलं तर कुणाचं ऐकतही नाही. म्हणजे फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. असं म्हणत अजित पवारांनी बावनकुळेंवर निशाणा साधला.
Read also
- दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा
- सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा
- मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?
- सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
- “राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी