नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहे. तर बाहेर भाजप आणि शिवसेनेत बॉम्ब वार सुरू झालं आहे. अलिकडेच आम्ही लवकरच मोठा बाॅम्ब फोडणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी या वादात उडी घेतली असून त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?
संजय राऊतांनी विदर्भात येऊन बाॅम्ब फोडण्याची भाषा करू नये. त्यांचे आधीच 40 आमदार गेले हा बाॅम्ब फुटला आहे. अडीच वर्षात काय काम केलं आहे हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन, परंतु देवेंद्र फडणवीसांनी जरी लंवगी बाॅम्ब फोडला तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिसणार नाहीत. असा टोला नवनीत राणा यांनी लगावला.
विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
देवेंद्र फडणवीसांना कोणाचा बाॅम्ब काढण्यात रस नाही. काम करताना प्रत्येकाकडून चुका होतात जर आम्ही सुरू केलं तर खुप भारी पडेल. विदर्भात काय कामं केली. हे संजय राऊतांनी सांगावं. त्यांनी जर काम सांगितली तर मी माझी सगळा पगार देईल. असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
Read also
- “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”
- “सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”
- “गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
- “नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”
- अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान