नागपूर : गायरान जमीन आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सव प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा विषय आज अधिवेशनात मांडण्यात आला. यावरुन भव्य कृषी-क्रिडा सांस्कृतिक महोत्सवात सरकारी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला.
अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान
वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा दाखला यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत केला. एकंदरीत 15 कोटी रूपयांची उलाढाल या प्रकरणात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. एका बाजूला गायरान जमीन देण्याचा राज्य मंत्र्यांना अधिकार नसतानाही गायरान जमीनीचे वाटप करणे तसेच अधिकाऱ्यांना वेठीस धरून पैसे गोळा करण्याचे प्रयत्न करणे हे नीतिमत्तेत बसेत का असा सवाल खडसे यांनी केला. असा प्रकाचा भ्रष्टाचार जबाबदार व्यक्तीकडून होत असेल तर या संपुर्ण घटनेची चौकशी करून हा पैसा नेमका जातो कुठे, त्याचे नियम काय, राज्यात सर्वत्र ही वसूली सुरू असल्याने घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली.
रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?
कृषी विभागाच्या नावाखाली सिल्लोड महोत्सवात झालेल्या गैरव्यवहाराचे अनेक पुरावे समोर आल्यामुळे तो विषय विरोधीपक्षाने आग्रहाने उचलून धरला. मात्र इतर अनेक जबाबदार मंत्र्यांची प्रकरण वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर येत असली तरी त्यावर सभागृहात बोलताना सर्व ठोस पुराव्यासहीत ती गोष्ट मांडणे योग्य ठरेल, असे अजित पवार म्हणाले.
Read also
- “फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा
- “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”
- “सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”
- “गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
- “नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”