नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या सरकारमधील मंत्रीमंडळातील अनेक मंत्री अडचणीत सापडले. यातच दोन दिवसापुर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तारांर गंभीर आरोप करण्यात आले. यातच आता शिंदे सरकारमधील बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे.
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशाच तसं उत्तर, सीमाप्रश्नी ठराव एकमतानं मंजूर”
त्यावर दादा भुसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मालेगाव मध्ये शिवपुराणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमासाठी हजारो महिला कार्यक्रमासाठी आल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याठिकाणी जाऊन व्हिडीओ काढू शकता. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांना जे प्रश्न विचारायचे असतील ते सभागृहात विचारावे असं आव्हाडांना उद्देशून दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
“सत्तारांना फटकारल्यानंतर त्याचा त्रास भाजपलाच होईल, हे भाजपलाही माहितीय”
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हि़डीओमध्ये दादा भुसे तरूणांना जबरदस्त मारहाण करतांना दिसत आहेत. तसेच त्याला अश्लिल शब्दात शिव्या देखील देतांना दिसत आहे. त्यामुळे आता दादा भुसे यांच्यावर कारवाई केली जाणार का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारमधील आणखी एक मंत्री आता अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, मंत्री दादा भुसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस घेणार. पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलात. सीबीआय चौकाशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सर्वोच्च न्यायालयात मध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक घेतली. असं म्हणत आता बोला. असं आव्हाडांनी ठणकावून सांगितलं आहे.
Read also
- सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा
- मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?
- सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
- “राज्यात सर्वत्र ही वसूली, सत्तारांची चौकशी करा”; एकनाथ खडसेंची सभागृहात मागणी
- “फडणवीसांनी लंवगी बाॅम्ब फोडला तर उद्धव ठाकरे कुठे दिसणारच नाही”; नवनीत राणा