नागपूर : शिंदे सरकारमधील फक्त शिंदे गटातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली आम्हाला भाजपचं पुरवत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यातच अलिकडेच शिंदे सरकारमधील अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत यांच्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी आता मोठा बाॅम्ब टाकला आहे.
“स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नाचा ठराव येणार होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सीमावादाचा ठराव येत असताना इतर कोणतेही विषय घेऊ नका म्हणून सांगितलं. त्यामुळे आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं विधानसभेत मांडली नाहीत. अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं देणारे तुमचेच सहकारी आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.
“जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी घोटाळा हे एक टोक आहे. अजून असंख्यप्रकरणं बाहेर येतील. महाराष्ट्रातील असो, दिल्लीतील असो की इतर राज्यातील सरकारमधील भ्रष्टाचारी लोक राजीनामा देत नाही. पंतप्रधा नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचार नको, मोदी नागपुरला आले होते. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला नाही. असं सांगितलं पण त्यांनी आजूबाजूला पाहिले असते तर भ्रष्टाचारी लोक दिसले असते. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Read also
- “शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
- “अब्दुल सत्तार या रावणाची लंका दहन करून 2024 ला वनवासाला पाठवू”
- आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
- अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं
- शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट