नागपूर : पंढरपुर काॅरिडोरचा विषय मांडत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोदींचा रावण असा उल्लेख केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत सभागृहात चांगलचं खडसावलं. त्यानंतर लगेचच अमोल मिटकरी यांनी सभागृहात झालेल्या प्रकराबाबत दिलगिरी व्यक्त केली.
मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?
अमोल मिटकरी यांनी सभागृहात भाजप नेते सुब्रमण्यम् स्वामी यांचं ट्विट वाचलं. स्वामींनी या ट्विटमधून नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती. त्यात मोदींना रावण असं संबोधण्यात आलं होतं. त्यावर सभागृहात एकच गदारोळ झाला. अमोल मिटकरी यांनी याबाबत माफीनामा द्यावा अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी केली.
सीमा भागातील इंच इंच जागा घेऊ…! मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा
देशाच्या पंतप्रधानांचा आदर राखणे हे एक नागरिक आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याबाबत सभागृहात असे विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना तारतम्य बागळले पाहिजे. यावर विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी देखील अमोल मिटकरींना समज दिली.
Read also
- शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट
- “स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
- “जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
- दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा
- सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा