पुणे : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गायरान जमीनीबाबत मुद्या उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. वाशिम जिल्ह्यातील सरकारी गायरान जमीन घोटाळा झाला असून या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा
वाशिम जिल्ह्यातील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची किंमत सुमारे 150 कोटी आहे. गायरान जमिनी सर्वोच्च निकालाप्रमाणे कोणाला देता येत नाहीत. यावरून सर्वोच्च न्यायालयाने देखील यावरून ताशोरे ओढले आहेत. योगेश खंडारे ही व्यक्ती सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत होती, असे निरिक्षण कोर्टोने नोंदवले आहे. 17 जुन 2022 रोजी 37 एकर सरकारी गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता.
सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा
गायरान जमीनी घोटाळ्यावरून सुरज चव्हाण यांनी सत्तार यांच्यावर कडाडून टिका केली आहे. अब्दुल सत्तार हे दहा तोंडाचे भ्रष्टाचारी रावण आहेत. प्रत्येक तोंडाने फक्त खायचं काम करतात. हनुमानाच्या साथीने बिभीषणाच्या मदतीने या रावणाची लंका 2024 दहन करून वनवासाला पाठवू. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अब्दुल सत्तार हे दहा तोंडाचे भ्रष्ट्राचारी रावण आहेत.प्रत्येक तोंडाने फक्त खायचं काम करतात.हनुमानाच्या साथीने बिभीषणच्या मदतीने या रावणाची लंका 2024 दहन करून वनवासाला पाठवू.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) December 27, 2022
Read also
- आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
- अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं
- शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट
- “स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
- “जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा