नागपूर : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या जोरदार वादळी सुरू आहे. यावर्षी हिवाळी अधिवेशन दोन आठवडे असून त्यातील दोन ते तीन दिवसचं आता शिल्लक राहिलं आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विधानसभेतील कामकाजाबाबत प्रश्न विचारले असता आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू, का मारामारी करू? असा शाब्दिक फटकेबाजी अजित पवारांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.
सीमावाद..! कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळा
सुयोग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी केली आहे. सभागृहात तुम्ही सत्ताधारी पक्षाला वेढीस धरण्यास कमी पडत आहात का ? तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढली आहे काय़ असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले की, आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू, का मारामारी करू? अहो, शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि विरोेधी पक्षात असतानाही त्यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. म्हणजे काय गुळपीठ असते का? असं म्हणत अजित पवारांनी जोरदार उत्तर दिलं.
मोठी बातमी…! अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येणार…?
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जिथे विरोध करायचा तिथे तो आम्ही करतच असतो. असंही अजित पवारांनी म्हटलं. जे आमदार पाच वर्षासाठी निवडून येतात, त्यांना पेन्शन मिळते, पण तीस वर्ष काम करूनही शिक्षक व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, हा विरोधाभास योग्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदारांनी केली.
Read also
- अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं
- शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट
- “स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट
- “जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
- दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा