नागपूर : राज्याच्या मागील काही महिन्यापासून महापुरूषांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडलं होतं. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. यातच आघाडीच्या काही नेत्यांकडूनही अशाच पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत विरोधकांना जोरदार उत्तर देत अनेक नेत्यांचा समाचारही यावेळी घेतला.
“जर मी मनावर घेतलं, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करेन”, अजित पवारांचा बावनकुळेंना कडक इशारा
ठाकरे गटाच्या नेत्या म्हणाल्या, संजय राऊतांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत. त्यांनी शिवबांसारखा हिरा जन्माला घातला. आपण कुणाशी तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात. कुठल्याच मातेच अपमान नाही. पण ही तुलना होऊ शकते काय? असा सवाल करीत फडणवीसांनी सुषमा अंधारेंवर भाष्य केलं.
दादा भुसेंची तरूणाला मारहाण, आव्हाडांचं ट्विट, दादा भुसे म्हणाले, सभागृहात प्रश्न विचारा
तसेच अमोल मिटकरी बोलले की, शरद पवार आमचा विठ्ठल आहे. ते चांगल्या हेतून बोलले असतील. शरद पवार मोठेच नेते आहेत. पण देवाशी तुलना होऊ शकते का? असा सवालही त्यांनी केला. तसेच छत्रपती उदयनराजे यांना ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे मागणारे लोकसुद्धा आपल्याकडे आहेत. हा छत्रपती घराण्याचा अपमान नाहीय का? आपण आज ज्यावेळी असं बोलतो की, हो आमच्यावर अफजल खानाच्या फौजा पाठवा. म्हणजे तुम्ही स्वत:ला छत्रपती समजता? तुम्ही स्वत:ला छत्रपती समजून अशाप्रकारे बोलता ? असं म्हणत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
Read also
- “अब्दुल सत्तार या रावणाची लंका दहन करून 2024 ला वनवासाला पाठवू”
- आता सभागृहात फडणवीसांशी कुस्ती करू की मारामारी ? अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
- अमोल मिटकरींचं ते वाक्य, अन् त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी झापझाप झापलं
- शिंदे गटाचे 4 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता..! ठाकरे गटाकडून लवंगी बाॅम्बचा स्फोट
- “स्वतंत्र विदर्भ करण्याचा फडणवीस ठराव आणणार होते, पण..” अजित पवारांचा मोठा गौप्सस्फोट