नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यावेळी त्यांनी आपल्या विधान परिषद सभासदस्यत्वपदाचाही राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. परंतु सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावरून आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना शाब्दिक टोला लगावला आहे.
“शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारच्या फायली भाजपच पुरवतंय”, संजय राऊतांनी टाकला बाॅम्ब
उद्धवजी, एकांतात दिलेला शब्द आपण कधी पाळत नाहीतच, किमान जनतेला जाहीरपणे दिलेला शब्द तरी पाळा. असा टोला लगावत त्या पुढे म्हणाल्या की, मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे, असं 29 जून 2022 रोजी बोलंला होता. आठवतं का? असा सवाल केला. तसेच आज त्याला सहा महिने झाले. वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा. बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“शरद पवार आमचा विठ्ठल, असे मिटकरी बोलले, देवाशी तुलना होऊ शकते का?” फडणवीसांचा सवाल
दरम्यान, हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादबाबत भाष्य ही केलं आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आठवा दिवस असून हे अधिवेशन दोनच आठवडे असल्याचं सांगितलं जात आहे.
उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द आपण कधी पाळत नाहीतच, किमान जनतेला जाहीरपणे दिलेला शब्द तरी पाळा! मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे असं २९जून२२ रोजी बोलला होता. आठवतं का? आज त्याला सहा महिने झाले, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा. बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका.
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 29, 2022
Read also
- “अनिल देशमुख साहेबांची राजकीय कारकीर्द स्वच्छ … करारा जबाव मिलेगा”
- “तोपर्यंत तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या…! अजित पवार सभागृहातच संतापले”
- “उद्या सरकारमधील सर्वांत मोठ्या दरोडेखोराचं प्रकरण बाहेर येणार?”; विरोधकांचा कडक इशारा
- एकच भाऊ बच्चू कडू..! अधिवेशनास्थळीच पालीत राहून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनात बसले
- “सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”