नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा उर्वरित विस्तार अजूनही झालेला नाही. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टिका केली जात आहे. यातच आज हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर जोरदार टोलेबाजी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकच भाऊ बच्चू कडू..! अधिवेशनास्थळीच पालीत राहून आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनात बसले
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस साहेब तुम्ही कधी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहात. आमचे भरत गोगावले साहेब कधी पासून कोट तयार करून बसले आहेत. तसेच आमच्या वेळी 4 महिलांना मंत्रिमंडळात संधी दिली होती. तुम्ही देणार का फक्त तुम्हीच सर्व खाती स्वत; कडे घेणार का ? असा शाब्दिक सवाल अजित पवारांनी केला.
“सर्पोंनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश, भाजपच्या विकृत राजकारणाचा अंत”
अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराची काळजी करू नका, पहिल्यांदा आम्ही महिलांना संधी देऊ, तसेच कुणी कितीही कोट शिवून ठेवले असतील, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. असं उत्तर फडणवीसांनी अजित पवार यांना दिलं.
Read also
- विदर्भ मजबूत , तर राज्य मजबुत…! मुख्यमंत्र्यांचं विदर्भसाठी खास पॅकेज जाहीर
- “उद्धवजी, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा, बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका”
- “अनिल देशमुख साहेबांची राजकीय कारकीर्द स्वच्छ … करारा जबाव मिलेगा”
- “तोपर्यंत तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या…! अजित पवार सभागृहातच संतापले”
- “उद्या सरकारमधील सर्वांत मोठ्या दरोडेखोराचं प्रकरण बाहेर येणार?”; विरोधकांचा कडक इशारा