मुंबई : शिवसेनेत भूकंप येईल अशी ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाली आहे. अनिल परबांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक नेत्यानं केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतं आहे.
रामदास कदमांनी आरोप फेटाळले
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी मीडियाशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले होते. रत्नागिरी परिषदेतील खेडचे क वर्ग नगरपालिकेतील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. आमच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावाची शहानिशा केली, सुनावणी घेतली आणि हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. खेडेकर हे कोर्टात गेले होते. न्यायालयामधून त्यांनी चार आठवड्याची स्थिगिती घेतली. त्यानंतर ते प्रचंड बिथरले. त्यांनी माझ्यावर निखालस खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप केले, असा दावा कदम यांनी केला होता.
वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फूट; मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढत रंगणार
अनिल परब यांचा जो रिसॉर्ट आहे. त्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे मी केली, असं खेडेकर यांचं म्हणणं आहे. खेडेकरांचं हे म्हणणं हस्यास्पद आहे. गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही. भेटणं तर लांबच झालं. सोमय्यांना टीव्हीवर कधी तरी पाहतो. मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. मी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही हे सर्व महाराष्ट्र जाणून आहे. मी अनिल परबच्या हॉटेलची तक्रार का करणार? तसं केल्यानं काय साध्य होणार आहे? अनिल परब हे माझ्या पक्षाचे मंत्री आहेत. याचं मला भान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.
Read Also :
- ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
- राज्यात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ
- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर
- निलेश लंकेंच्या पत्राच्या घरात शरद पवारांची बैठक; लाकडी कपाटाला प्लॅस्टिकची खुर्ची टेकवून बसले
- सरकार ज्या- ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही आमच्या पैशातून विकास करणार – नितीन गडकरी