अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. कोव्हिड काळात राज्यात सर्वात मोठं कोव्हिड सेंटर उभा करणारे आमदार म्हणून निलेश लंके हे नाव राज्यभर गाजलं होतं. आमदार लंके स्वत: कोव्हिड सेंटरमध्ये राहत होते.
शिवसेना नेते आनंदराव आडसुळांची तब्येत खालावली; दुसऱ्या रुग्णालयात हालवलं
दरम्यान, आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना. आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं.
सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक
शरद पवार हे लंकेच्या घरी दाखल झाले. त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकून ही खुर्ची ठेवली. मागच्या भिंतीला गुलाबी रंग होता. गुळगुळीत आणि चकचकीत बंगल्याच्या भिंती जशा असतात तसं चित्र अजिबात नव्हतं. पवारांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे निलेश लंके यांचे आई-वडील बसले होते.
प्रोटोकॉलप्रमाणे चिपी विमानतळाच उद्घाटन होणार; नारायण राणेंच नाव कितव्या क्रमांकावर?
आमदार लंके यांच्या छोटेखानी घरात राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांसोबत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले. राज्यातील भारदस्त नेते छोट्या घरात आल्यानंतर, लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पवारांच्या बाजूला खाटवजा पलंगावर धनंजय मुंडे बसले, दुसऱ्या खुर्चीवर हसन मुश्रीफांनी बैठक मारली तर रोहित पवार आजूबाजूला जागा शोधत होते.
Read Also :
- सरकार ज्या- ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही आमच्या पैशातून विकास करणार – नितीन गडकरी
- कुठेही गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोकं म्हणतात गडकरी साहेबांची कृपा; पवारांकडून कौतूकाची थाप
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; काही दिवस आराम करणार असल्याची ट्विटरवर माहिती
- पवारसाहेबांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचयं – खासदार अमोल कोल्हे
- पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?