भोपाळ : देशात कोरोनारुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग देखील मंदावला आहे. रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. या संकटाच्या काळात आता भाजप नेते आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी कोरोनाला देखील जगण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य केले होते. आता भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
एकीकडे कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध सापडलेले नाही. अशात प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपण गोमूत्र पितो, त्यामुळे कोरोना झालेला नाही, असे विचित्र वक्तव्य केले आहे.
"गौ मूत्र लेने से फेफड़ों का इंफेक्शन दूर होता है, मैं लेती हूं इसलिए मुझे कोरोना नहीं हुआ" :
– BJP सांसद प्रज्ञा@drharshvardhan – Sir, is it true? pic.twitter.com/jLdyR2PBSs
— Srinivas B V (@srinivasiyc) May 17, 2021
एका कार्यक्रमात बोलतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते गोमूत्र पिल्यामुळे कोरोना होत नसल्याचा दावा करत आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, देशी गायीचे गोमूत्र आपण प्यायलो तर फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. पण मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच करोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला करोनाही झाला नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी गोमूत्रामुळे आपला कर्करोग बरा झाला, असा दावा केला होता.
Read Also :
- ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला ? अजित पवार म्हणाले…
- ‘म्युकरमायकोसीस’ रुग्णांच्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- कुस्तीपटूच्या मृत्यू प्रकरणी ऑलिम्पकविजेता सुशील कुमार फरार, एक लाख रुपयांचे इनाम जाहीर
- ‘या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत’
- ‘तौक्ते हे राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’