नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात सागर राणा या युवा कुस्तीपटूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी सुशील कुमारला फरार घोषित केले असून, त्याच्यावर इनाम जाहीर केले आहे.
दिल्लीतील छत्रसाल स्डेडियमच्या बाहेर झालेल्या भांडणात कुस्तीपटूचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात सुशील कुमारचे नाव पुढे आले होते व तो तेव्हापासून फरार आहे.
Case relating to killing of Sagar Rana at Chhatrasal Stadium | Reward of Rs 1 Lakh on info leading to arrest of wrestler Sushil Kumar announced. Rs 50,000 reward announced for Ajay, who is absconding too: Delhi Police
Non-bailable warrant has been issued against Kumar & others. pic.twitter.com/0gsp04aStm
— ANI (@ANI) May 17, 2021
पोलिसांनी आता सुशील कुमारला फरार घोषित केले असून त्याचा पत्ता सांगणाऱ्याला एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. त्याच्यासह आणखी एक आरोपी अजयही फरार असून, त्याच्यावर 50 हजार रुपयांचं इनाम जाहीर झालं आहे. पोलिसांनी कुमार व इतरांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस एनसीआर प्रदेश आणि आसपासच्या राज्यांत छापा टाकत आहेत. फ्लॅट रिकामा करण्यावरून कुस्टीपटूंमध्ये वाद झाला असल्याचे सांगितले जात आहे.
Read Also :
- ‘या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत’
- ‘तौक्ते हे राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’
- ‘एकाचे लक्ष मुंबईवर तर दुसऱ्याचे बारामतीवर, उर्वरित राज्य वाऱ्यावर’
- काँग्रेसची आग्रही मागणी, तातडीने नुकसानीचे पंचनामे करा
- लवकरच आणखीन एक वादळ? गृहमंत्र्यांची परवानगी न घेता राज्याचे महासंचालक चंदीगडला!