मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन खुप दिवस झाले तरी अद्यापही त्यांच्या संपुर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या वेळी ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावत शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी आमदार मंत्रिपदासाठी दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत.
शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री सरकारमध्ये आहेत. यातच आता पहिल्या टप्प्यात वर्णी न लागलेल्या इच्छकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत. यामध्ये शिंदे गटातील संजय शिरसाठ, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवा, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा समावेश आहे. यामधून कुणाला संधी मिळणार त्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
तर दुसरीकडे भाजपमधून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर, आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. यातच शिंदेंसोबत गेलेल्या 10 अपक्ष आमदारांमधून बच्चू कडू यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र सगळ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी शिंदेंना मोठी कसरत करावी लागणार आहे.
“संजय राऊतांची आज पुन्हा कोर्टवारी….!” आज कोर्टात महत्वपुर्ण याचिकेवर सुनावणी
दरम्यान, दिल्ली दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते राज्यातील विकास कामे, मंत्रिमंडळ विस्तार, आणि राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पत्रकार परिषेद देखील घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत नेमक काय बोलणार? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
- “शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
- मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
- “माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
- “राजकारण सोडून दे, नाहीतर पेट्रोल पंपावर जाळून टाकू, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन”,; करूणा मुंडेंची तक्रार