मुंबई : आगामी महापालिका निवडणुका, चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक यासंदर्भात आज राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलवली. या बैठकीत राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकां तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत.चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीत चर्चा करून आम्ही उमेदवार देणार असल्याची माहिती अलिकडेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली होती. त्याचसंदर्भात आज मुंबईत बैठक झाली आहे.
“संजय राऊतांची आज पुन्हा कोर्टवारी….!” आज कोर्टात महत्वपुर्ण याचिकेवर सुनावणी
कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या फायर ब्रॅंड नेत्या रूपाली पाटील यांनी निवडणुक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केलीय. तर चिंचवडमधूनही राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असं कार्यकर्तेचं म्हणणं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यातच कसबा पेठ पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपसह शिवसेना, मनसेही आपला उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचं बोललण्यात येत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार का ? याची उत्सुकता आता राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.
Read also
- “शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
- मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
- “माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
- “राजकारण सोडून दे, नाहीतर पेट्रोल पंपावर जाळून टाकू, मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन”,; करूणा मुंडेंची तक्रार
- भारतीय जुमला पार्टीचे प्रत्येक पाप जनतेपर्यंत पोहचवा..! काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरूवात