मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप करताना टिकेची पातळी ओलांडताना दिसत आहे. अलिकडेच सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती. यातच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत जहरी टिका केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
“स्वांतत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या मातृसंस्थांच्या पिल्लांनी सावरकरांबाबत बोलू नये”
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या प्रकरणावर ते बोलत होते. जयंत पाटील हा राज्यातला बिनडोक नेता आहे. जयंत पाटील पालकमंत्री असताना माझ्या भावाविरोधात हद्दपारीची नोटीस काढण्यात आली, त्यांचं उत्तर द्या. आमच्यावर अनेक गुन्हे नोंद केले, आमच्या कार्यकर्त्यांना हद्दपार केलं. तेव्हा तुम्ही काय करत होतात. असा सवाल त्यांनी केला आहे.
“खरं बोलण्यासाठी हिमंत लागते, अन् ती हिमंत राहुल गांधींकडे आहे”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातला प्रत्येक नेते गर्दीत असतो, नेत्याने महिलेला गर्दीतून असं बाजूला केल्याचा एक व्हिडीओ मला दाखवा. आम्ही त्यांची माफी मागतो. असं म्हणत त्यांनी जयंत पाटील यांच्या या वक्तव्याला काडीची किंमत नाही. आम्ही कोणतंही राजकारण करत नाही. पोलीस पोलिसांच्या पद्धतीने काम करतात. त्या महिलेले तक्रार दाखल केली आहे. त्याचा तपास पोलीस करतील. विरोधकांसोबत असं चुकीच्या पद्धतीने वागायची गरज आम्हाला नाही, असंही विधान त्यांनी केलं आहे.
“सावरकर इंग्रजांकडून महिन्याला 60 रूपये पेन्शन घेत होते”; नाना पटोले यांचं वक्तव्य
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर संबंधित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Read also
- “भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवा..!” राहुल गांधींचं भाजपला आवाहन
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला
- “राहुल गांधींच्या वक्तव्याने देशातील काँग्रेसचा जनाधार संपला”
- “शेगावला जा अन् राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा”; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश