दोडामार्ग : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात ६ जागांवर विधानपरिषदेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती . त्यात सुरुवातीला दोन जागा बिनविरोध झाल्या. काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव आणि शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांची विधानपरिषद आमदारपदी निवड करण्यात आली होती. त्यांनतर धुळे-नंदुरबार आणि कोल्हापूरची जागा देखील बिनविरोध करण्यात आली.
कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
आता महाराष्ट्रात आणखी एक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. ते म्हणजे नगरपंचायत निवडणुकांचे. यात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी एक नगरपंचायत आहे जिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते.सर्व राजकीय पक्षांनी या ठिकाणी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरवात केली. भाजप यावेळेला स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे येत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आम्हाला गाफील ठेऊन अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमचा गेम केला – गिरीश महाजन
राष्ट्रवादी काँग्रेस यावेळेला शिवसेनेसोबत आहे. तथापि, सुरेश दळवी यांनी संपर्क कार्यालय सुरू करुन निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शिवसेना, मनसे आणि काँग्रेस आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे. या वेळेला भाजप शिवसेना विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असे चित्र दिसणार नाही तर ते भाजप विरुद्ध संपूर्ण महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं समीकरण दिसून येणार आहे.
अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांना एकत्र बांधून ठेवण्यास साह्यभूत ठरेल, असे वाटत असले तरी जागा वाटपावेळी त्यांच्यात कुरबुरीचे दर्शन घडण्याची भीती आहे. मागच्या वेळेला काँग्रेसने चार तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्या जागांवर ते दोन्ही पक्ष दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यावेळी काँग्रेसमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपला मदत केली होती. आताही ते सर्वजण भाजपवासी असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला नवे चेहरे रिंगणात आणून जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
Read Also :
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावनी; आमदार महेश लांडगे यांची माहिती
- दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
- सरकार पडणार असे म्हटलं तर कोणाच्या पोटात का दुखतं?; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोमणा
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश