मुंबई : आज सकाळीच मुंबईत शिवसेना नेते आणि मुंबई महानगरपालिका समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा
यशवंत जाधव यांच्यावर कारवाई केल्यानंतर लगेचच भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेला संबोधले आहे. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांचे नाव काल मी समोर आणलेल्या ‘डर्टी डझन’ यादी मध्ये नव्हते ते आज मी यामध्ये टाकत आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव परिवाराने खूप मोठा घोटाळा केला आहे. यांचे घोटाळे हे हायकोर्टात, ईडीमध्ये, आयकर विभागामध्ये सिद्ध झाले आहेत आणि त्यामुळेच यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे फॉर्म भरत असताना उमेदवार जे ऍफिडेव्हिट सादर करतात ते आयकर विभागाकडे जात असते. निवडणूक विभागाला देखील हा रिपोर्ट जात असतो. यामिनी जाधव, यशवंत जाधव प्रकरणात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी आहे जिचा फ्रॉड करण्यात आला आहे. महापालिका ठेकेदारांकडून जो काही दोन नंबरचा पैसे येतो तो हवालयाद्वारे वितरित करण्यात येतो. उदयशंकर महावार हा या हवाल्याला चालवतो. हा उदयशंकर महावार सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबियांचे हवाले बघतो असा गंभीर आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे संबंध समोर येतात असं देखील सोमैया यांनी म्हटलं आहे.
Read also:
- बार्बाडोसमधून भगोड्या चोक्सीला भारतात न आणणारे दाऊदला कधी आणणार ? शिवसेनेची रोखठोक सवाल
- ज्यांना सोडून जायचं आहे, त्यांनी आताच जा नाहीतर..; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना इशारा
- नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना
- शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
- संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका