मुंबई : कथित ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी, मेधा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नवघर पोलिस ठाण्यात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी तक्रररीत करण्यात आली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात वाद सुरू आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून, राऊत यांच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहाराबाबतच्या एका प्रकरणात, संजय राऊत याना ५८ लाख रुपये भरावे लागले आहेत. तसेच, दुसऱ्या एका प्रकरणात संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांची संपत्ती जप्त झाली आहे.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोटींच्या देणग्या कशा मिळाल्या? ईडी, सीबीआय, आयटीच्या रडारवर असणाऱ्या कंपन्यांना देणग्या देण्यात आल्या, तपास यंत्रणांच्या रडारवरील कंपन्यांकडून सोमय्यांची खंडणीखोरी सुरू आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केले आहे.
Read also:
- एनआयएने दहशतवादी दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; पण नवाब मलिकांचं नाव चर्चेत, दोघं ताब्यात
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
- तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी