पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रसेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हॅशटॅग पुणे या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पुणे शहाराचे भाजपचे खासदार गिरीश बापट देखील उपस्थित होते. यावेळी गिरीश बापट यांनी शरद पवारांसमोर चांगलीच टोलेबाजी करत चिमटा काढला. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे हे गिरीश बापट यांचे मित्र आहेत. त्यावरून त्यांचे गिरीश बापट यांनी चिमटे काढले. मी बापट असलो तरी तो पोपट आहे. असं गिरीश बापट म्हणाले. तसा तो बोलतो चांगला तसा लिहितोही चांगला त्याचा पुरावा हा आहे. काकडे यांना काहीही द्या पण भगतसिंह कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? अशी मिश्किल टिप्पणी देखील बापटांनी केली.
बापटांच्या या विधानामागे दोन वर्षापासून राज्यपालांकडे रखडलेल्या बारा जणांच्या नावांचा संदर्भ आहे. यावरून महाविकास आघाडी विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष सगळ्यांना माहिती आहे. राजकारण हाच व्यवसाय बनल्याची सध्याची परिस्थिती आहे. अटल बिहारी वाजपेयी पुलाचे नाव दिलं. पण खाली संकल्पनेला दुसऱ्याचे नाव असते. संकल्पना म्हणजे काय हे मला समजतच नाही. असं म्हणत त्यांनी पुण्यातील नगरसेवकांना खडेबोल सुनावले.
“रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, पुण्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत. पाणी पुरवठ्याची चर्चा सभागृहात होत नाही. आपल्या आंदोलनातून लोकांचा फायदा होईल, अशी आंदोलने झाली पाहिजेत. आपली प्रसिद्धी होईल म्हणून आंदोलन करू नये. असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला वंदना चव्हाण, श्रीनिवास पाटील देखील उपस्थित होते.
Read also:
- “वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द
- “राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका
- “मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
- “बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
- “ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले