नागपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोठ्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला. त्यातुनच नागपुरात आयआयएम साकार होत आहे. आयआयएम नागपुरला मंजूर झाल्यानंतर वाद झाला. कुणी म्हटलं औरंगाबाद आणि ऩाशिक आयआयएमचा प्रस्ताव होता. पंरतु प्रस्ताव नागपुरचाच होता. मिहानमध्ये 150 एकर जमीन दिली. प्रधानमंत्री यांच्या हस्ते भूमिपुजन झाले. आज लोकार्पण होत आहे. अशी भावना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आयआयम नागपुर उद्घाटन सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील उपस्थित होते. तसेच केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरी देखील व्यासपीठावर होते.
नागपुरात एम्स आणलं. ट्रिपल आयआयटी, लॉ स्कुल यासारख्या मोठ्या संस्था नागपुरात आणल्या . आज नागपुर शिक्षणाचं हब बनलयं. जिथं मानव संसाधन असेल तिथेच उद्योग येतात. आयआयएमने जागतिक स्तरावरचे ह्युमन रिसोर्सेस तयार केलं आहे. आय़आयएममुळे लवकरचं नागपुर जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणार अशी आशा देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
“निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला 600 कोटी रूपये आम्ही दिले. जागा पण दिली पंरतु त्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपुजनाला बोलवलं नाही. उद्घाटनाला बोलवलं नाही. पंरतु आयआयएमनं आम्हाला बोलवलं. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. आयआयएमचं कॅम्पास खुप सुंदर आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडतोय.
पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होतं. युवकांना संधी मिळावी. यासाठी देशातील शैक्षणिक संस्थाच्या विस्ताराची योजना आखली. तत्कालीन मानव संसाधन मंत्री स्मृती इऱाणी यांनी नागपुराला ही संस्था दिली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून ही संस्था नागपुरला व्हावी. यासाठी चर्चा केली. त्यातून ही संस्था उभी राहिली असंही ते म्हणाले.
Read also:
- “बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
- “ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
- राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस; रोहित पवार, राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेही करणार अयोध्या दौरा
- “मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी तिथे निवडणुक लढवेन”; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
- “रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल