मुंबई : मागील काही काळात चांगल्या कामाच्या जोरावर देशात अव्वल आले. त्यामुळे एकाची पोटदुखी सुरू झाली आहे, तर दुसऱ्याची बेंबी दुखी आहे. एक भोंगा आहे तर दुसरा सोंगा आहे. असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चॅलेजनंतर केला.
“निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे
समाजमाध्यांवर जे काही फोटो आले आहेत. ते लोकांना माहिती आहेत. त्यामुळे बबली मोठी झाली नाही तर बबली नासमज झाली आहे. पाठीमागे जो एल्पिपाय लावला जातो. राज्यातील जे जे मुख्य राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळूच शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्याबद्दल बोलतात. हे सर्व प्रसिध्दी मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यांना दोन दिवसात रूग्णालयात कोण जाऊन भेटले. ? तिकडची त्यांना उर्जा आहे. ज्या वेळी असे काही चॅलेज शिवसेनेला येतात तेव्हा आम्ही उजाळतो. असंही ते म्हणाल्या.
पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना
हनुमान चालिसा पठण गुन्हा असेल तर मी 14 वर्ष तुरूंगात राहण्यासाठी तयार आहे. तेवढ्याच ताकतीने मी पुन्हा बाहेर येईन, मला कुणी थांबवू शकणार नाही. तसेच येणाऱ्या काळात रामभक्त आणि हनुमान भक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देतील. असा घणाघात खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणुक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
“काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
उद्धव ठाकरे यांना मी चॅलेंज देते की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मतदार संघ निवडावा. त्यांच्या विरोधात मी त्या मतदारसंघात निवडणुक लढवेन. स्वत: च्या नावावर इमानदारीवर त्या मतदार संघात मी निवडून येईन असा चॅलेज नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी नवनीत राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं आहे.
Read also:
- “ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
- राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस; रोहित पवार, राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेही करणार अयोध्या दौरा
- “मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी तिथे निवडणुक लढवेन”; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
- “रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
- “टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांच्या टीमने तयार रहावं”; सभेआधी मुख्यमंत्र्यांना भाजपने डिवचलं