पुणे ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मनसेच्या कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर त्यांच्या पुढे हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान केले होते. मात्र राज ठाकरे यांच्या आवाहानाला मनसे नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना मनसे शहाराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यावर आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांना सुनावलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
वंसत मोरे म्हणाले की, मी आजारी आहे, मी पक्ष सोडणार, अशा चर्चा गेल्या काही महिन्याभरापासून सुरु आहे. पंरतु असं काहीच नाही. पक्षातील काही असुंतष्ट आत्मे माझ्या पक्ष सोडण्याबाबत सतत अफवा पसरवत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पक्षातच आहे आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचे मी राज ठाकरे यांच्या कानावर घातले आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
अलिकडेच 4 मे रोजी मनसेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते. त्यावेळी वसंत मोरे हे बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तसेच मनसेच्या काही कार्यक्रमाला देखील वसंत मोरे गैरहजर होते. त्यावरून वंसत मोरे यांनी पक्ष सोडला की काय?अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
दरम्यान, वंसत मोरे यांनी पोलिसांची रितसर परवानगी घेऊन पुण्यात कागज येथील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मुस्लिम कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्ष सोडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
Read also:
- “आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात
- शिरूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय ‘ठिणगी’; ‘पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच होणार !’, राऊतांची घोषणा
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल