पुणे – सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभेचे खासदार असलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांचं काय होणार? असा प्रश्न राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यामुळे शिरुरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना- राष्ट्रवादीत राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. कारण शिरुर लोकसभा मतदार संघातील पुढचा खासदार हा शिवाजीराव आढळराव पाटील हेच होतील, अशी गर्जना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही कोल्हे- आढळराव यांचा संघर्ष थांबलेला नाही. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये अगोदरच विळ्या-भोपळ्याचे राजकीय वैर आहे. त्यातचबैलागाडा शर्यतींपासून अगदी पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
दरम्यान, खेड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते यांनी पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जाहीर प्रचार सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यानंतर खेडमध्ये जनसंपर्क कार्यालय उघडून एकप्रकारे मोहिते यांना कोल्हेंनी अव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, शिरुरमधील बिबट्या सफारी पार्क, इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प, शिवनेरीच्या पायथ्याची विकासकामे, शिवनेरीजवळ प्रस्तावित कत्तलखाना, बैलगाडा शर्यतींचा श्रेयवाद अशा विविध कारणांनी सेना-राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता शिरुरचा पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद आढळराव पाटील यांच्या पाठीशी आहे. शिवसेना-राष्ट्रवादीत काय तोडगा काढायचा ते आम्ही काढू.. , असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
शिवसेना नेते आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बनके यांच्याही खुल्या व्यासपीठावर हमरी-तुमरी झाल्याचे पहायला मिळाले. खेड पंचायत समिती निवडणुकीच्या काळातील शिवसेना- राष्ट्रवादीतील संघर्ष अगदी गोळीबारापर्यंत पोहोचला. या सर्व प्रकारांवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बारीक लक्ष ठेवून आहेत. याबाबत त्यांनी वारंवार राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना जाहीरपणे फटकारले आहे. जुन्नर विधानसभा मतदार संघात आजी-माजी आमदारांचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून, शिवसेनेच्या नेते आशा बुचके यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आणि संजय राऊत यांनी यापूर्वीच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिरुर मतदार संघावर शिवसेनेने दावा केल्यास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. डॉ. कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर समझोत्याची सूतराम शक्यता नाही. मात्र, सध्यस्थितीला बदललेले राजकारण पाहता महाविकास आघाडीच्या साठमारीत शिरुरची जागा शिवसेना सोडल्यास डॉ. कोल्हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
Read also:
- राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच वसंत मोरे मैदानात; महाआरतीचे आयोजन; कात्रजमध्ये जय्यत तयारी
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम