पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे स्पष्ट आहे. तरीही आघाडी सरकारचे नेते ओबीसी आरक्षणासहच निवडणुक होईल, असे कशाच्या आधारावर सांगतात? पाच परिषदांमध्ये ओबीसींच्या जुन्या राखीव जागा रद्द होऊन त्या खुल्या समजून पोटनिवडणुक झाली. सरकारला हे रोखता आले नाही. आघाडीचे नेते ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवत आहेत. ते ओबीसींना फसवत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या या सरकारने पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी चाचणी पुर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होणार नाही, असा स्पष्ट निकाल दिल्यानंतर सत्ताधारी सरकारने त्या दृष्टीने कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. असंही ते म्हणाले.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसींसाठी आरक्षण नसले तरीही भारतीय जनता पार्टी सीटक्के जागांवर ओबीसींनाच उमेदवारी देईल. इतर राजकीय पक्षांनीही अशी बांधिलकी दाखवावी. उत्तर प्रदेशातील एका भाजपा खासदाराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक आहे. ही पक्षाची भूमिका नाही, असंही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी भाजप मनसे युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, भाजप मनसे युती करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मनसेकडून तसा काही प्रस्तावही आलेला नाही. त्यामुळे भाजप मनसे युती होणार का? ते आता पहाणं पुढे महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “महागाईचा भोंगा वाजला, गॅस 50 रुपयाने वाढला”; रूपाली पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
- शिरूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय ‘ठिणगी’; ‘पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच होणार !’, राऊतांची घोषणा
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल