पुणे : गेल्या काही महिन्यापासून देशात एव्हाना राज्यात मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीस येऊन गेला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमंती देखील सातत्याने वाढत चालल्या आहेत. यामुळे लोकांना उन्हाच्या झळा सहन करता करता आता महागाईच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत. मात्र याकडे सरकार राजकारणात मश्गुल झाला आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
त्या म्हणाल्या की, महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला . चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे ,गॅस मध्येच भरमसाठ वाढ झाली. परत चुलीकडे जावेच लागणार,पोटाचा प्रश्न आहे ना. असं म्हणत त्यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा देखील प्रश्न केला आहे.
ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
रविवारी 14.2 किलोग्रॅमचा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात प्रती 50 रूपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे घरगुती एलपीजी गॅसच्या 14.2 किलोच्या गॅससाठी सर्वसामान्यांना आता 999.50 रूपये मोजावे लागणार आहेत. तर 1 मे रोजी 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 102.50 रूपयांची वाढ झाली होती. त्यामुळे हा सिलेंडर आता 2 हजार 355.50 मिळत असून एकाच आठवड्यात सिलेंडरच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत.
राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या भोंग्याचं राजकारण जोरात सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात भूमिकेमुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टिका होत आहे. तर महागाई, इंधन दरवाढ आणि वीज संकंट याकडे सध्या राजकारणी नेत्यांचं लक्षच नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काही काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहत. त्यामुळे याचा परिणाम उमेदवारांवर होण्याची शक्यता आहे.
Read also:
- शिरूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय ‘ठिणगी’; ‘पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच होणार !’, राऊतांची घोषणा
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’