पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मनसेच्या कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर त्यांच्या पुढे हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान केले होते. मात्र राज ठाकरे यांच्या आवाहानाला मनसे नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना मनसे शहाराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर मनसेने आयोजित केलेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते. त्यानंतर काल त्यांनी कात्रज येथे महाआरतीचं आयोजन केलं होतं.
राज ठाकरे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. पंरतु मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महाआरतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाहीत. त्यावर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची पुण्यातील राजमहाल याठिकाणी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी समाज माध्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
राज साहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचं मला माहीत नव्हतं. तुमच्या प्रसार माध्यमांमुळेच साहेब पुण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली. परंतु त्यापुर्वीच मी महाआरतीचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल राज ठाकरे यांना मॅसेज करून कळवलं होतं. तसेच या महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या महाआरतीनंतर राज ठाकरे यांची पुण्याची निवासस्थानी भेट घेतली.
दरम्यान, आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबाबत चर्चा झाली. काल झालेल्या महाआरतीचं साहेबांनी कौतुक केलं. तसेच साहेबांना काल येता आलं नाही. परंतु वसंत तु मिसळ महोत्सव घे, मी येतो. असा सल्ला त्यांनी मला दिला. तसेच राज ठाकरेंना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. साहेब निश्चितच लवकरच येतील, त्या कार्यक्रमाची तारीख लवकच जाहीर करणार आहे, असंही वसंत मोरे यांनी सांगितलं.
Read also:
- “राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका
- “मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
- “बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
- “ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
- राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस; रोहित पवार, राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेही करणार अयोध्या दौरा