मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष आता कुठे तरी थांबला होता. तो पुन्हा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे. त्यांनी आज सकाळीच किरीट सोमय्यांच्या संबंधीत दोन ट्विट केलं आहे. यावेळी राऊतांनी किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
“मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
किरीट सोमय्यांच्या विरोधात राऊतांनी ट्विट करत म्हटलं आहे की, किरीट का कमाल..! वर्ष 2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केला होता. त्यानंतर त्या कंपनीच्या प्रमुखाची चौकशी झाली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजीए असं म्हणत त्यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
“बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
या प्रकरणी संजय राऊत किरीट सोमय्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. इडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला की हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणरेडा डाव आहे. याचा हिशोब द्यावाच लागणार असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. याप्रकरणी धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे तक्रार केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
दरम्यान, संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये मागील काही महिन्यामध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळाला. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावताच राऊतांनी देखील सोमय्यांविरोधात बाण सोडण्यास सुरूवात केली. आयएनएस विक्रांत प्रकरण, तसेच असे अनेक आरोपांवरून संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अलिकडचे यांच्यातील हा राजकीय संघर्ष क्षमलेला असताना पुन्हा एकदा तो बाहेर आला आहे.
Kirit ka Kamal!
2013-14:
Kirit makes allegations agnst a company2016:
Company Chief is probd by @dir_ed2018-19:
Yuvak Pratishthan gets HUGE donation frm d Very SAME compny.Aap Chronology samjhiye!
BTW,Isn’t ths a case of ED & EOW invstgatn?
I wil file a complnt soon! pic.twitter.com/hpFMTaeUFG
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 9, 2022
Read also:
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
- तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी
- “वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द
- “राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका