मुंबई : मुंबई पोलिसांनी एसआरए घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली आहे. उद्या पुन्हा पेडणेकर यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बोलावलं आहे. दादर पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली गेली. यातल्या दोघांनी स्टेटमेंटमध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं आहे. एसआरए चा फ्लॅट द्यायच्या नावाखाली पैसे घेतले गेले. पण फ्लॅट मिळाला नाही. अशी तक्रार 9 जणांनी दाखल केली आहे.
“मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या 9 जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही भाग किशोरी पेडणेकर यांना देण्यात आल्याचं अटकेत असलेल्या आरोपींनी सांगितलं आहे. त्यामुळे आज पहिल्यांदाच किशोरी पेडणेकर यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. या घोटाळ्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 9 पीडीत होते. अटक केलेल्या चारपैकी एक बीएमसी अधिकारी होती. असंही सांगण्यात येत आहे.
“सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”
किशोरी पेडणेकर यांच्यावर याप्रकरणी चौकशी करण्यात आल्यानंतर भाजपने नेते किरीट सोमय्यांनी देखील त्यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली आहे. तर मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील त्यांना खोचक टोला लगावला आहे. तर माझ्या आयुष्याचे पुस्तक उघडे आहे. माझं सासर आणि माहेर हे वरळी विधानसभा मतदारसंघातच आहे. मी गोमातानगरमध्ये 2017 साली फॉर्म भरला होता. तेव्ही मी केअर ऑफ म्हणून हा फॉर्म भरलेला होता. पण कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही. असं पेडणेकरांनी ठणकावून सांगितलं आहे.
Read also
- “केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”
- “केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”
- “खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
- अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे
- “राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”