कराड, ता. २३ : कृष्णा कारखान्याच्या इतिहासात सभासदांना दरवर्षी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने, आता सभासदांना ही ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याची महत्वपूर्ण घोषणा रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जाहीर सभेत केली आहे. मोफत साखर घरपोच देण्याच्या या घोषणेमुळे सभासदांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले असून, सहकार पॅनेलच्या या घोषणेचे सर्वस्तरातून मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, “अविनाश मोहिते ९५ दिवस तुरुंगात का गेले होते हे एकदा त्यांनी जनतेला सांगावे” मदनराव मोहितेंची टीका
कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ रेठरे हरणाक्ष येथे अभूतपूर्व प्रतिसादात सहकार पॅनेलची सभा झाली. या सभेच्या व्यासपीठावर विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक व उमेदवार संजय पाटील, जे. डी. मोरे, जितेंद्र पाटील, संचालक सुजीत मोरे, कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, भगवानराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की आम्ही २०१५ साली जेव्हा सत्तेवर आलो तेव्हा कारखान्याची स्थिती फारच बिकट होती. पण सगळ्या संकटातून मार्ग काढत आज आम्ही कारखाना सुस्थितीत आणला आहे. गेल्या ५ वर्षात सरासरी ३००० रुपयांपेक्षा जास्त दर आम्ही सभासदांना दिला आहे. डिस्टीलरी चांगली चालविली आहे. कृषी महाविद्यायलाची सुसज्ज इमारत साकारून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. नवा इथेनॉल प्रकल्प साकारला आहे. भविष्यात त्याठिकाणी दररोज १ लाख लिटर उत्पादन करणार इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्याचा आमचा इरादा आहे.
हे पण वाचा, महाडिक गटाचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा; डॉ.सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंची घोषणा
याउलट विरोधकांनी गैरव्यवहारांव्यतिरिक्त दुसरे काहीही केले नाही. खोट्या सह्या करून त्यांनी उचललेले ५८ कोटींचे कर्ज आता व्याजासह १०० कोटींचे झाले असून, त्याला संपूर्णत: त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे. तर दुसरे एक विरोधक ज्या पतसंस्थेचे मार्गदर्शक आहेत, त्या पतसंस्थेतून लोकांच्या ठेवी मिळेनाशा झाल्या आहेत. अशा बेजबाबदार लोकांच्या हातात आपण सत्ता देणार आहोत का? असा सवाल करत, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनेललाच साथ द्या, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
संस्थापक पॅनेलच्या कारभारावर टीका करताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, की अविनाश मोहिते हे अपघाताने तयार झालेले नेतृत्व आहे. कारखाना चालवायला या माणसाने एक पत्रकार ‘बाबा’ नेमला. तो पत्रकार एवढा हुशार की त्याने मनोमिलनच होऊ दिले नाही. खरंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा या निवडणुकीशी काहीही संबंध नसताना ते यात का उतरले होते, हे समजायला कारण नाही. संस्थापक पॅनेलचे नेते जेव्हा मते मागायला येतील, तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जेलमध्ये का गेला होता? हा कारखाना सक्षमपणे चालविण्याची धमक फक्त डॉ. सुरेश भोसले यांच्यामध्येच असून, कारखान्याला वैभव मिळवून देण्यासाठी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करा.
हे पण वाचा, महाडिक गटाचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा; डॉ.सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंची घोषणा
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांचेही भाषण झाले. या सभेत संस्थापक व रयत पॅनेलच्या अनेक दिग्गजांनी सहकार पॅनेलमध्ये प्रवेश करत आपला पाठिंबा व्यक्त केला. सहकार पॅनेलच्या या अभूतपूर्व सभेला सभासदांनी मोठी गर्दी केली होती.
अतुलबाबांच्या मागणीला मिळाली प्रचंड दाद..
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सभासदांना दिलेले मोफत साखरेचे वचन पाळले आहे. आता पुन्हा सत्तेवर आल्यावर सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी सर्व सभासदांना दिली जाणारी मोफत साखर घरपोच द्यावी, अशी मागणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभेत केली. त्यांच्या या मागणीला सभेतून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी सहकार पॅनेल सर्व सभासदांना मोफत साखर घरपोच देईल, अशी घोषणा केल्यावर सभासदांनी मोठ्या उत्साहात याचे स्वागत करत, सहकार पॅनेलच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
हे पण वाचा,
“कारखाना डबघाईला आणणारे विरोधक सभासदांचे काय भले करणार?’’ सुरेश भोसलेंनी घेतला विरोधकांचा समाचार
सहकार पॅनेलमध्ये दिग्गजांचा प्रवेश
या जाहीर सभेचे औचित्य साधून संस्थापक व रयत पॅनेलच्या समर्थकांनी, तसेच माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनेक निकटवर्तीयांनी सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने रेठरे बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक पोपटराव जाधव, माणिकराव जाधव, दिपक पाटील, संपतराव थोरात, जयवंतराव मोहिते, सांगली जि.प.चे माजी सभापती जगन्नाथ माळी, पं.स. कराडचे माजी सभापती किसनराव जाधव, सदाभाऊ शेवाळे, विकास मगदूम, सुनील कणसे, उदयसिंह कणसे, गणेश पाटील, उदय पाटील आदींचा समावेश आहे.