मुंबई : राज्य सरकारने महामारीची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत १५ मे पर्यंत लॉकडाऊनसोबतच कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी येत असली, तरी रुग्णांचा आकडा हा ५० हजारांच्या आसपास आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याबाबतची चर्चा झाली बैठकीत झाली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, तसेच याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि दोन दिवसात नियमावली जाहीर होईल असं ते म्हणाले.
At the Cabinet meeting, the health department & ministers proposed to extend the lockdown for 15 days. The chief minister will take a final decision on this matter: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/tjIEQZ8YLg
— ANI (@ANI) May 12, 2021
तसेच, १८ ते ४४ वयोगटातलं लसीकरण थांबवण्यात यावं अशी चर्चाही बैठकीत झाली असल्याचं सांगितलं असून, राज्यात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने, या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सध्या स्थगित करण्यात येणार असल्याची चर्चा बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिली.
Vaccination for 18-44 age group has been suspended for the time being due to shortage of vaccines. All the doses purchased by the state government for the age group will now be diverted for the 45+ category: Maharashtra Health Minister Rajesh Tope after state Cabinet meeting pic.twitter.com/hZIoJqqevP
— ANI (@ANI) May 12, 2021
यावेळी टोपे यांनी अधिक स्पष्टीकरणादाखल सांगितलं की, ” ४५ वर्षांवरील नागरिकांनाचा अद्याप दुसरा डोस देणं आहे. कोव्हिशिल्डचा दुसरा डोस २ महिन्यानंतर, तर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस महिन्यानंतर द्यावा लागतो. दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास या लसीकरणाचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे दुसरा डोस देणं अनिवार्यच आहे. त्यामुळे राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाईलाजाने १८ ते ४४ वयोगटासाठीचं लसीकरण स्थगित करण्यात येणार आहे.
Read Also :
- बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा चर्चेत, म्हणाले…
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण
- मोदींच कौतुक करण्यासाठी केला ‘ध’ चा ‘मा’; The Guardian च केलं The Daily Guardian
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस