मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. एकिकडे अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. ते म्हणतायत… थोडं थांबा, काही दिवसांत आम्ही काय करतो? ते पाहा. अशी राजकीय भुकंप होणारी विधानं गवळी यांनी केली आहेत.
हेही वाचा… लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?
शिंदे गटातील कोणताही आमदार किंवा खासदार नाराज नाही. ठाकरे गटाच्या लोकांनी पारावरच्या गप्पा मारणं बंद करावं, असा टोला भावना गवळी यांनी लगावला. तसेच ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. तेच स्वत:च काही दिवसांत बंडखोरी करतील, असं सूचक विधान भावना गवळी यांनी केलं आहे.
हेही वाचा… उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना भवन, सर्व शाखा आणि निधी यावर शिंदे गटाकडून दावा
एका वृत्तसंस्थेशी भावना गवळी यांनी संवाद साधला. संजय राऊतांच्या टीकेबद्दल विचारलं असता भावना गवळी म्हणाल्या, आजकाल काही लोकांना पारावरच्या गप्पा मारण्याची खूप सवय लागली आहे. खरं म्हणजे, कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले होते.
Read also
हेही वाचा… Big News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, दोन आमदार करणार पक्षांतर !
हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग, अमित शाह लवकरच…