मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरचं मुंबई दौरा करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळणं लागणार आहे.
हेही वाचा…“संजय राऊतांनी गंगेत स्नान करून आपली पापं धुतली पाहिजे”
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहे. पुढील रविवारी 16 एप्रिल रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाणं आलं आहे. अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
काही तासांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर भाष्य केलं होता. या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील अशी भविष्यवाणी पाटील यांनी केली होती. अशातच अमित शाह पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकीय गोटात उलटसुलट चर्चा सुरु होत आहे.
हेही वाचा…“नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले”, काॅंग्रेस नेत्याचाच पटोलेंवर गंभीर आरोप
महारष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा हे मुंबईत येत असल्याचे सांगण्यात आले आहे
Read also
हेही वाचा… लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?
हेही वाचा… उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना भवन, सर्व शाखा आणि निधी यावर शिंदे गटाकडून दावा
हेही वाचा… Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट सांगितला महिना..!
हेही वाचा…“अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा”