पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. आता या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि मविआकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.
महाविकास आघाडीमधून पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचं तिकीट काँग्रेस उमेदवाराला दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या जागेसाठी राष्ट्रवादी देखील इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून पुण्यनगरीचे भावी खासदार प्रशांत जगताप अशा आशयाची बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता राष्ट्रवादीही लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं बॅनरवरून स्पष्ट होत आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर आता जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं ही भावना असते, कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये हे बॅनर लावले आहेत, मात्र अद्याप लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पक्षाचा आदेश सर्वांना मानावा लागतो, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक नक्की लढेल, असेही प्रशांत जगताप म्हणाले.
Read also
हेही वाचा… उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना भवन, सर्व शाखा आणि निधी यावर शिंदे गटाकडून दावा
हेही वाचा… Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट सांगितला महिना..!
हेही वाचा…“अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा”
हेही वाचा…“संजय राऊतांनी गंगेत स्नान करून आपली पापं धुतली पाहिजे”