शिवसेना शिंदे गट आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने अगोदर भुजबळ, मग नारायण राणेंना अन् त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेतून फोडलं”
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटला दिले आहे. त्यामुळे शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना झाली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये पक्षनिधीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. म्हणून मुंबईचे वकील आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची चल -अचल संपत्ती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात आता काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा… भोसरीत बुधवारी वीर सावरकर गौरव यात्रा; प्रसिद्ध व्याख्याते नितीन आपटे यांचे व्याख्यान
दरम्यान, ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती. या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट येत्या 24 तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, आशिष गिरी यांनी सादर केलेल्या याचिकेचा आणि शिंदे गटाचा काही संबंध आहे की नाही याची काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळेही तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Read also
हेही वाचा… Big Breaking : महापालिका निवडणुका कधी होणार?; चंद्रकांत पाटील यांनी थेट सांगितला महिना..!
हेही वाचा…“अजित पवार यांची गणना भाजपच्या अंधभक्तात होऊ नये ही आशा”
हेही वाचा…“संजय राऊतांनी गंगेत स्नान करून आपली पापं धुतली पाहिजे”
हेही वाचा…“नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले”, काॅंग्रेस नेत्याचाच पटोलेंवर गंभीर आरोप