उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या सोबत ४० ते ५० आमदारांनी शिवसेना सोडत बंड करून शिंदे गट स्थापन केला त्यांनतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचे सरकार राज्यात प्रस्थापित झाले. मात्र आता उलट गेम होत आहे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील एक मातब्बर नेता सध्या बंडाच्या तयारीत असून शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या काही महिन्यांपासून रखडला आहे.
शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करत असतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात अनेकदा आमदारांनी मागणी सुद्धा केली आहे मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदेंबरोबर आलेले काही आमदार शिंदेंवर नाराज असल्याची चर्चा आहे.
दरम्यान सत्ताधारी गटातील एक आमदार जे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहे, त्यांना सध्याच्या शिंदे – फडणवीस मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे – फडणवीसांना धारेवर सुद्धा धरल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान हेच आमदार आता बंडाच्या तयारीत असून शिंदेंचा हात सोडत ते ठाकरे गटात प्रवेश करतील अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळते आहे.
Read also
“आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू”
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…“समाजातील प्रत्येक व्यक्तींना उभारी देण्याची शिकवण शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली”
हेही वाचा…“तर मी लाखो, करोडो रूपयाची मागणी केली असती, पण फक्त तीन रूपयाची मागणी केली”