एकनाथ शिंदे गटातील नेत्या दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्याचबरोरबर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व देखील स्वीकारल्याचा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
दीपाली यांचे पाकिस्तानच्या बँकेत खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गज नेत्यांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व दिपाली सय्यद यांनी घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते आहे. यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू, दीपाली सय्यद अनेकदा पाकिस्तानात जातात, कराचीत राहतात.आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालतो. आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत. अश्या प्रकारची मागणी भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Read also
हेही वाचा…बोटीच्या अपघातातून उदय सामंत, संभाजी राजे सुखरूप, अपघाताचं समोर आलं कारण
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…“समाजातील प्रत्येक व्यक्तींना उभारी देण्याची शिकवण शरद पवार साहेबांनी आम्हाला दिली”