मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरेंनी निवडणुक आयोगावर टिका केली. आता निवडणुक आयोगाने कोर्टाला याबाबत एक पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता
केंद्रीय निवडणुक आयोगानं सुप्रीम कोर्टात याबाबत उत्तर दिलं आहे. निवडणुक आयोगाने १० पानी उत्तर सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. एकनाथ शिंदे यांना चिन्ह देण्याचा निर्णय कायद्यानुसार योग्य होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणुक आयोगावर जो आरोप केला आहे. तो चुकीचा आहे. आम्ही हा निर्णय संविधानाला अनुसरून केला आहे. नियमांनुसारच आम्ही हा निर्णय घेतला आहे. असंही त्यात म्हटलं आहे.
हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
राज्यपाल राजकीय पक्षाशिवाय इतर कोणालाही मान्यता देऊ शकत नाहीत. राज्यपाल व्यक्तींना मान्यता देऊ शकत नाही. समजा उद्या वेगवेगळ्या पक्षातील काही आमदार बाहेर पडले आणि म्हणाले की आमचे बहुमत आहे. अशावेळी राज्यपाल त्या आमदारांना बहुमत सिद्ध करण्याची परवानगी देऊ शकतील का ? असं केलं तर मोठा गोंधळ निर्माण होईल. राजकीय पक्षच सभागृहात व्हिपची नियुक्ती करतात. आसाममध्ये भाजपच्या मांडीवर बसून गोगावले यांना व्हीप म्हणून नियुक्त करता येणार नाही. ४ जुलैपर्यंत सुनील प्रभू हे विधानसबेत कागदावर व्हीप होते आणि त्यांना मान्यताही मिळाली होती. असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
जेव्हा आमदार निवडून येतो तेव्हा तो पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि रिटर्निंग ऑफिसर त्यांना पत्र देतात की ते एका विशिष्ठ राजकीय पक्षातून निवडून आले आहेत. आमदाराची सबागृहातील ओळख म्हणजे त्यांचा राजकीय पक्ष आणि त्याशिवाय दुसरे काहीच नाही. सभापती, राज्यपाल केवळ राजकीय पक्षाला मान्यता देतात. आमदाराला राजकीय पक्षाशिवाय दुसरी ओळख नाही.
Read also
- हेही वाचा…“सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं”, ठाकरेंचा भाजपला टोला
- हेही वाचा…“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं
- हेही वाचा…जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय
- हेही वाचा.“शीतल म्हात्रे बहिणीसमान, मला आणि माझ्या कुटुंबीयाला प्रचंड मानसिक त्रास झाला,” सुर्वेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं”, 4 पैकी एकच मुद्दा योग्य, न्यायाधीशांची मोठी टिप्पणी