कोल्हापूर : साकीनाका बलात्कार प्रकरणावर आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे समाज हादरुन गेला आहे. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केलीय. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – नवाब मलिक
एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अशा घटनांमध्ये सहभाग दिसतोय. तर इथे सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जातोय. कमी कलमं लावली जात आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. पटापट जामीन होत आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पण आता पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार, अशी खोचक टिप्पणीही पाटील यांनी केली आहे.
कोविडच्या काळात आचारसंहितेच्या नावाखाली अतिरेक चालला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला सूट दिली जातेय. तर इतरांना परवानगी काढायला लावली जातेय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हैराण करणं सुरु आहे, असा आरोपही पाटील यांनी केलाय. तसंच पवार काहीही म्हणाले तरी काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. काँग्रेस आता पक्ष राहिला नाही. वैयक्तिक निर्णय घेतले जात आहेत. यातील बहुतेकजण सत्ता मिळते ना मग सहन करा असंच म्हणतील, असा खोचक टोलाही पाटील यांनी काँग्रेसला लगावलाय.
Read Also :
- साकीनाका बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
- ‘त्या’ दुर्दैवी घटनेचं राजकारण, म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार’
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- ‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’