मुंबई : देशात सर्वात जीएसटी कर भरणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर लागतो. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराकडे बघितले जाते. यातच आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील आमदारांच्या संपत्तीबाबत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील आमदारांकडे सर्वात जास्त संपत्ती असल्याचं दिसून आलं आहे.
हेही वाचा…शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी कधी घेणार, ? राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
एडीआर संस्थेच्यावतीने देशातील २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये देशात कर्नाटक राज्यातील २२३ आमदारांकडे १४ हजार ३५९ कोटींची संपत्ती तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात २८४ आमदारांकडे ६ हजार ६७९ कोटींची संपत्ती असल्याचं निर्दशनात आलं आहे. कर्नाटकच्या अभ्यासासाठी २०२३ तर महाराष्ट्रसाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल केलेल्या संपत्तीचा अभ्यास करण्यात आला आहे.
हेही वाचा…शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंना घातला गराडा, मुंडेंवर प्रश्नांची केली सरबत्ती
महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराकडे सरासरी २३ कोटी ५१ लाखांची संपत्ती आहे. तर अहवालातील माहितीनुसार, ९० कोटी संपत्तीसह त्रिपूरा राज्यातील ५९ आमदार सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. भाजपकडे १६ हजार कोटी, तर काॅंंग्रेसकडे १५ हजार कोटी एडीआरच्या अहवालात दाखल केलेल्या माहितीनुसार आहे. एडीआरच्या अहवालात पक्षानुसार संपत्तीचीही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या १,३५६ आमदारांकडे १६ हजार २३४ संपत्ती, काॅंग्रेसच्या ७१९ आमदारांकडे १५ हजार ७९८ कोटींची संपत्ती, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ६३ आमदारांकडे ९१२ कोटी असून यादीत नवव्या क्रमांकावर हा पक्ष आहे.
मालदारांचे राज्य राज्य – आमदार – एकूण संपत्ती
कर्नाटक – २२३ – १४ हजार ३५९ कोटी
महाराष्ट्र – २८४ – ६ हजार ६७९ कोटी
आंध्र प्रदेश – १७४ – ४ हजार ९१४ कोटी
उत्तर प्रदेश – ४०३ – ३ हजार २५५ कोटी
गुजरात – १८२- २ हजार ९८७ कोटी
प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे इतके…
कर्नाटक – ६४ कोटी ३९ लाख
आंध्र प्रदेश – २८ कोटी २४ लाख
महाराष्ट्र – २३ कोटी ५१ लाख
गुजरात – १६ कोटी ४१ लाख
उत्तर प्रदेश – ८ कोटी ७ लाख
READ ALSO :
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर
हेही वाचा…मोठी बातमी…! महाराष्ट्राचे ५० तडपदार आमदार मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ५० उमेदवार ठरवणार
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे”
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका