कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेथे उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जी यांनी ‘मी भाजपसमोर झुकण्यापेक्षा गळा कापून घेणं पसंत करेल’, अशी गर्जनाच केली आहे. बंगालमधील हुगली येथे एका सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या लोकांनी माझा अपमान केला आहे. मी बंदुकीच्या गोळीवर विश्वास ठेवत नाही तर मी राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बंगालचा अपमान केला आहे.
या कार्यक्रमात जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने घोषणा दिल्या असत्या तर मी तुम्हाला सलाम केला असता. पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर अशावेळी प्रतिहल्ला कसा करायचा हे मला चांगलच माहीत आहे, असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला.
Read Also :
- ‘राहुल गांधींना रोज मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर’, भाजपची सेनेवर बोचरी टीका
- ‘या तथाकथित पर्यावरणप्रेमी कुटुंबियाने…’, अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल
- मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ला ? गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
- राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी ? शिवेंद्रराजेंसह अनेकजण पुन्हा परतण्याचे नवाब मलिकांकडून संकेत
- ‘महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’, मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन